स्विस स्पर्धा
| आता चालू | |||
|---|---|---|---|
BlitzLichess Swiss ने | 3/10 फेऱ्या5+0 • वेगवान • मानांकित | ७९ | |
Bullet IncrementLichess Swiss ने | 14/20 फेऱ्या1+1 • विद्युतवेग • मानांकित | ५५ | |
Classical IncrementLichess Swiss ने | 3/5 फेऱ्या25+3 • शास्त्रीय • मानांकित | ३७ | |
Daily RapidDaily Tourneys ने | 4/7 फेऱ्या10+5 • द्रुतगती • मानांकित | २९ | |
| LipkeUSTOZ4000original ने | 5/11 फेऱ्या3+0 • वेगवान • मानांकित | २२ | |
| लवकरच सुरू होत आहेत | |||
|---|---|---|---|
HyperBullet IncrementLichess Swiss ने | 20 फेऱ्या0+1 • विद्युतवेग • मानांकित | ११ | |
| Кубок ТырпыровцовTRPRSKR_Club ने | 5 फेऱ्या3+2 • वेगवान • मानांकित | १० | |
| Classical Increment SwissThe Supreme Alliance of Royal Chess Warriors ༒ ने | 7 फेऱ्या25+10 • शास्त्रीय • मानांकित | ४ | |
PRIZE-WINNING CHESS TOURNAMENTAngelvsdemon ने | 7 फेऱ्या3+0 • वेगवान • मानांकित | १३ | |
| ÖZEL TURNUVAYUNUS EMRE SATRANÇ KULÜBÜ KÜTAHYA ने | 5 फेऱ्या6+2 • वेगवान • मानांकित | ९ | |
स्विस प्रकारच्या स्पर्धेत (wiki), प्रत्येक स्पर्धक इतर सर्व स्पर्धकांशी खेळेलच असे नाही. प्रत्येक फेरीत स्पर्धक एकमेकांविरुद्ध खेळतात आणि त्यांच्या जोड्या अशा नियमांनुसार लावल्या जातात की, ज्यामुळे प्रत्येक स्पर्धकाचा सामना साधारणपणे समान गुणसंख्या असलेल्या प्रतिस्पर्ध्याशी होतो, मात्र एकाच प्रतिस्पर्ध्याशी पुन्हा सामना होत नाही. सर्व फेऱ्यांनंतर ज्या स्पर्धकाचे एकूण गुण सर्वाधिक असतात, तो विजेता ठरतो. खेळाडूंची संख्या विषम असल्यास अपवाद वगळता, सर्व स्पर्धक प्रत्येक फेरीत खेळतात.
स्विस स्पर्धा केवळ संघ-प्रमुखच तयार करू शकतात आणि त्यांत केवळ संघाचे सदस्यच खेळू शकतात.
स्विस स्पर्धांमध्ये खेळायला सुरुवात करण्यासाठी संघ बनवा किंवा सामील व्हा.
| तुलना | आखाडे | स्विस स्पर्धा |
|---|---|---|
| स्पर्धेचा अवधी | पूर्वनिर्धारित अवधी मिनीटांत | पूर्वनिर्धारित महत्तम फेऱ्या, पण अज्ञात अवधी |
| खेळांची संख्या | दिलेल्या कालावधीत जेवढे खेळता येतील तितके | आधीच ठरवलेले, सर्व खेळाडूंसाठी समान |
| जोडी जुळवण्याची प्रणाली | समान मानांकन असलेला कोणताही उपलब्ध प्रतिस्पर्धी | गुण आणि समान-तोड आधारित सर्वोत्तम जोड्या |
| जोड्या बनवण्यासाठी लागणारा वेळ | जलद: सर्व खेळाडूंची वाट पाहत नाही | हळू: सर्व खेळाडूंची वाट पाहते |
| तंतोतंत जोडी | शक्य, पण सलग नाही | निषिद्ध |
| उशिरा सामील झाले | हो | हो, जोपर्यंत निम्म्याहून अधिक फेऱ्या सुरू होणार नाहीत तोपर्यंत |
| थांबा | हो | हो पण ते फेऱ्यांची संख्या कमी करू शकते |
| विजयी मालिका आणि बेभान खेळ | हो | नाही |
| प्रत्यक्ष स्पर्धांसारखे | नाही | हो |
| अमर्यादित आणि मोफत | हो | हो |
अखाडा ऐवजी 'स्विस' स्पर्धांचा वापर कधी करावा?स्विस स्पर्धेत सर्व स्पर्धक समान संख्येचे सामने खेळतात आणि ते एकमेकांविरुद्ध केवळ एकदाच खेळू शकतात.
मंडळ आणि अधिकृत स्पर्धांसाठी हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.
गुण कसे मोजले जातात?विजयी खेळाडूला एक गुण, सामना बरोबरीत सुटल्यास अर्धा गुण आणि पराभव झाल्यास शून्य गुण मिळतात.
एखाद्या फेरीदरम्यान जेव्हा खेळाडूची जोडी जुळवता येत नाही, तेव्हा त्याला 'बाय' मिळतो आणि त्यासाठी एक गुण दिला जातो.
बरोबरीत संपलेल्या सामन्यांची गणना कशी केली जाते?सोनबॉर्न-बर्जर गुणसंख्या बरोबर.
खेळाडूने पराभूत केलेल्या प्रत्येक प्रतिस्पर्ध्याचे गुण आणि बरोबरीत सुटलेल्या सामन्यातील प्रत्येक प्रतिस्पर्ध्याच्या गुणांपैकी अर्धे गुण यांची बेरीज करा.
जोड्या कशा ठरवल्या जातात?FIDE हस्तपुस्तिका च्या अनुषंगाने, bbPairings द्वारे अंमलात आणलेल्या डच प्रणाली सह.
जर स्पर्धेत खेळाडूंपेक्षा जास्त फेऱ्या असतील, तर काय होईल?सर्व संभाव्य जोड्यांचे सामने खेळून झाल्यावर स्पर्धा संपवली जाईल आणि विजेत्याची घोषणा केली जाईल.
स्विस स्पर्धा केवळ संघांपुरत्याच मर्यादित का असतात?स्विस स्पर्धांची रचना ऑनलाइन बुद्धिबळासाठी केलेली नव्हती. या स्पर्धांमध्ये खेळाडूंकडून वक्तशीरपणा, निष्ठा आणि संयम यांची अपेक्षा असते.
आम्हाला वाटते की, जागतिक स्पर्धांच्या तुलनेत एखाद्या संघामध्ये या अटींची पूर्तता होण्याची शक्यता अधिक असते.
एका खेळाडूला किती 'बाय' मिळू शकतात?जेव्हा जोड्या लावण्याच्या प्रणालीद्वारे एखाद्या खेळाडूसाठी जोडी जुळवता येत नाही, तेव्हा त्या खेळाडूला एक गुणाची 'बाय' मिळते.
याव्यतिरिक्त, एखादा खेळाडू स्पर्धेत उशिरा सामील झाल्यास त्याला अर्ध्या गुणाची 'बाय' दिली जाते.
सुरुवातीच्या टप्प्यावर सामने बरोबरीत सुटल्यास काय होते?स्विस खेळांमध्ये, ३० चाली खेळल्याशिवाय खेळाडू सामना बरोबरीत सोडवू शकत नाहीत. जरी या उपायामुळे पूर्वनियोजित बरोबरी टाळता येत नसली तरी, ऐनवेळी बरोबरीवर सहमत होणे अधिक कठीण होते.
जर एखादा खेळाडू सामना खेळला नाही, तर काय होते?त्यांची वेळ सुरू होईल, ती संपेल आणि ते सामना हरतील.
त्यानंतर ही प्रणाली त्यांना स्पर्धेतून बाहेर काढेल, जेणेकरून ते आणखी सामने हरणार नाहीत.
ते कोणत्याही वेळी स्पर्धेत पुन्हा सामील होऊ शकतील.
न येणाऱ्या व्यक्तीं बाबत काय केले जाते?जे खेळाडू स्विस स्पर्धांसाठी नोंदणी करतात पण प्रत्यक्षात सामने खेळत नाहीत, त्यांच्यामुळे समस्या निर्माण होऊ शकते.
ही समस्या कमी करण्यासाठी, Lichess अशा खेळाडूंना काही काळासाठी नवीन स्विस स्पर्धांमध्ये सहभागी होण्यापासून तात्पुरते रोखते.
तथापि, स्विस स्पर्धेचे आयोजन करणारी व्यक्ती त्यांना स्पर्धेत सहभागी होऊ देण्याचा निर्णय घेऊ शकते.
खेळाडू उशिरा सामील होऊ शकतात का?हो, जोपर्यंत निम्म्याहून अधिक फेऱ्या सुरू झालेल्या नाहीत, तोपर्यंत सहभागी होता येते. उदाहरणार्थ, ११ फेऱ्यांच्या स्विस स्पर्धेत, खेळाडू ६ वी फेरी सुरू होण्यापूर्वी सहभागी होऊ शकतात. १२ फेऱ्यांच्या स्पर्धेत, खेळाडू ७ वी फेरी सुरू होण्यापूर्वी सहभागी होऊ शकतात.
उशिरा सहभागी होणाऱ्या खेळाडूंना - त्यांनी कितीही फेऱ्या गमावल्या असल्या तरीही - केवळ एकच 'बाय' मिळतो.
काय स्विस पद्धत अखाडा स्पर्धांची जागा घेईल?नाही. ती पूरक वैशिष्ट्ये आहेत.
मी Lichess वर राउंड-रॉबिन स्पर्धा खेळू शकतो का?आम्हाला ते समाविष्ट करायला आवडेल, पण दुर्दैवाने राऊंड रॉबिन ऑनलाइन चालत नाही.
याचे कारण असे आहे की, स्पर्धेतून लवकर बाहेर पडणाऱ्या खेळाडूंना हाताळण्यासाठी यात कोणताही योग्य मार्ग नाही. ऑनलाइन स्पर्धेत सर्व खेळाडू त्यांचे सर्व सामने खेळतील अशी अपेक्षा आपण करू शकत नाही. ते शक्यच नाही, आणि परिणामी बहुतेक राऊंड रॉबिन स्पर्धा सदोष आणि अन्यायकारक ठरतील, ज्यामुळे त्यांच्या अस्तित्वाचे मूळ कारणच निष्फळ ठरेल.
ऑनलाइन राऊंड रॉबिनच्या सर्वात जवळचा अनुभव घेण्यासाठी, तुम्ही खूप जास्त फेऱ्या असलेली स्विस स्पर्धा खेळू शकता. अशावेळी, स्पर्धा संपण्यापूर्वी सर्व संभाव्य जोड्या खेळल्या जातील.
इतर स्पर्धा पद्धतींबद्दल काय?सध्या Lichess वर आणखी स्पर्धा प्रणाली जोडण्याची आमची योजना नाही.


